अँटिलिया कट मविआच्या बदनामीसाठी रचलेले षडयंत्र

मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच रचला गेला होता असा आरोप माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी केला. या प्रसंगी सचिन वाझे, अँटिलिया प्रकरण, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग, निवडणूक आयोगाची मनमानी आणि ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणा-या ठाकरे बंधूंच्या संयुक्त महामोर्चाबाबत काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.

अँटिलिया प्रकरण आणि सचिन वाझे यांच्या न्यायालयीन घडामोडींवर बोलताना नाना पटोले म्हणाले, सचिन वाझेला जामीन मिळणे किंवा त्याचे सरकारी साक्षीदार होणे, हे होणारच होते. कारण हा संपूर्ण कट पूर्वनियोजित होता. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या माध्यमातून मविआ सरकार अस्थिर करण्यासाठी अंबानींच्या घराचा सहारा घेण्यात आला.

नागपूरहून आलेल्या जिलेटिनचे गूढ काय?
गाडीत ठेवण्यात आलेली जिलेटिन नागपूरमधून आणली गेली होती, अशी अधिकृत माहिती सरकारने सभागृहात दिली होती. मग हे जिलेटिन नागपुरातून कोणी पुरवले? त्यामागे कोणाचा हात होता? गाडी लावणारा माणूस दोनच दिवसांत पाण्यात बुडून आत्महत्या करतो असा बनाव कसा रचला गेला? हे सर्व चित्र महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि सत्ता बळकावण्यासाठी तयार केले गेले होते. आज परमबीर सिंग कुठे आहेत, याचा थांगपत्ता नाही आणि वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या तयारीत आहे. यावरून स्पष्ट होते की, सत्तेत बसलेल्यांनी पोलिस अधिका-यांना हाताशी धरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे पाप केले होते

४ ऑक्टोबरच्या महामोर्चात काँग्रेस सहभागी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत पुकारलेल्या महामोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा असून मोर्चात काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news