22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रअंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी

अंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधी आणि वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी आघाडी केल्याचे समोर आले. भाजपने एकीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती केली. तर, दुसरीकडे अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपने एमआयएमसोबत हातमिळवणी केली. या दोन्ही आघाड्यांमुळे भाजपला विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. दोन्ही आघाड्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून भाजपतील नेत्यांवरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळींवर काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या आघाडीवरून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि अकटकट सोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि अकटकट सोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झाले असेल तर चुकीचेच आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, भाजप आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता तुम्ही हिरवे झाले नाहीत का? :
राऊतांचा सवाल
खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजप दुतोंडी गांडूळ आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला. तिथे फडणवीस आणि ओवेसी भाई-भाई झाल्याचे चित्र आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस-भाजप एकत्र आले. मीरा-भाईंदर, अंबरनाथमध्ये ओवेसी, काँग्रेस यांच्याबरोबर निकाह लागलेला आहे. मग आता भाजप हे हिरवे नाही का झाले? दुतोंडी गांडूळ त्या पद्धतीने भाजपचे राजकारण सुरु आहे.’’ असे म्हणत त्यांनी टीका केली. मुस्लिम मतांसाठी एमआयएमचा थेट पाठिंबा घेत आहात. अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकटकट सोबत भाजपची छुपी युती आहे. काही ठिकाणी उघड आहे.’’ असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR