26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रअकोल्यात शिंदेसेनेत अंतर्गत वाद

अकोल्यात शिंदेसेनेत अंतर्गत वाद

मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत गोंधळ

अकोला : प्रतिनिधी
राज्यात काल नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. सर्वाधिक निकाल महायुतीच्या बाजूने पाहायला मिळाला. अकोल्यात मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटांत वाद झाला. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. हा वाद महापालिकेच्या जागा वाटपावरून झाला असल्याचे म्हटले जात आहे.

काल रात्री मंत्री संजय राठोड अकोल्यातल्या आरजे हॉटेलला मुक्कामी होते. याच ठिकाणी मंत्री राठोड यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण वाद झाला. शिंदेसेनेतीलच काही पदाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात सहा नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला मोठ अपयश आले आहे. शिंदे गटाचे केवळ ८ नगरसेवक निवडून आले.

ही नगरपालिका निवडणूक माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती. त्यामुळे आता अकोला महापालिका निवडणूक बाजोरिया यांच्या हाती न द्यावी, असा प्रस्ताव मंत्री राठोड यांच्यासमोर नवले गटाने ठेवला. याच दरम्यान जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि शिंदे गटाचे नेते बाजोरिया यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. अप्रत्यक्षपणे पिंजरकर यांना बाजोरीयांच्या समर्थकांनी सुनावले. दरम्यान, पक्षातील हा संपूर्ण राडा मंत्री संजय राठोड यांच्यासमोर झाला होता. राठोड यांनी पदाधिका-यांना शांत केले. दोन्ही गटांच्या बाजू ऐकल्यानंतर वरिष्ठांकडे यासंदर्भात कळविण्यात येईल, असे आश्वासन पदाधिका-यांना दिले. त्यानंतर हा वाद शांत झाला.

दरम्यान अकोला महापालिका निवडणुकीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा हस्तक्षेप नको, महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय पदाधिका-यांकडेच ठेवण्यात यावा, असा आग्रह नवले, पिंजरकर गटाकडून होता. तर पॅक भरणा-याच्या हातात निवडणुक नको, अशा घोषणा बाजोरियांच्या समर्थकांनी लावल्या होत्या.

याच वेळी काहींनी खुर्च्या देखील एकमेकांवर उचलल्या होत्या. मात्र मंत्री राठोड यांनी हा वाद थोड्यावेळातच मिटवला. महापालिकेच्या जागा वाटपावरून हा संपूर्ण वाद झाल्याचे बोलले जाते आहे. या वादानंतर मंत्री संजय राठोड अकोल्यातील पक्षातील काही पदाधिका-यांवर नाराज झाले होते. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हा्यावर आल्याच्या चर्चा होत आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेतील हा राडा कुठल्या स्तरावर जातो? आणि याचा परिणाम निवडणुकीवर काय होतो? हे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR