अखंडीत वीजसेवेसाठी संपुर्ण कार्यक्षमतेने काम करा

लातूर : प्रतिनिधी
विजेसारख्या सेवा क्षेत्राात आपण कार्यरत असून, वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा देणे ही आपली महत्वपुर्ण जबाबदारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करुन संपूर्ण कार्यक्षमतेने अखंडीत वीजसेवेसाठी प्रयत्नरत रहावे, असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) धनंजय औंढेकर यांनी दिले.
येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमूख सभागृहात  दि. २ मे रोजी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, अनिल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सुसंवाद मेळाव्यात लातूर मंडळातील हजारो जनमित्र, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना औंढेकर म्हणाले की, वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा दिली तर वीजग्राहक आपल्यापासून दुर जात नाही परिणामी आपण विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनीटची वसुली करणे सोपे जाते. सेवेप्रति निष्ठावान असलेल्या काही लाईनमनची उदाहरणे देत लाईनमन कसा असावा व कसा असू नये याविषयी मार्गदर्शन केले.
 मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतूक करत, केवळ एका महिण्याच्या कामगिरीवर समाधान मानून चालणार नाही, प्रत्यक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे अशाही सुचना केल्या. त्याचबरोबर १५ मे पर्यंत ३३ केव्ही ११ केव्ही वीजवाहिनीला अडथळा ठरणा-या झाडांच्या फांदयांची रितसर परवानगी घेवून छाटनी करून घ्­यावी. आपली वीजवाहिनी ट्रीप होते की नाही याची संबधीतांनी काळजी घ्यायला हवी. ट्रीपींग न झाल्यास वीजतारा तुटन्­यांचे प्रकार घडतात, प्रसंगी दुर्घटनाही घडू शकते. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या वीजतारेला लागुन वीजपुरवठा खंडीत तर होतोच सोबतच तब्बल ३० ते ४० हजार युनीटचे नुकसान होते. तसेच ३३/११ केव्ही उपकेद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन दिल्याची खात्री करावी असेही निर्देश दिले.
याप्रसंगी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनीही उपस्थितांना पंचसुत्रीचा अवलंब करत काम करण्याचे निर्देश दिले. सुसंवाद मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रशांत जानराव यांनी केले तर प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी केले. सदरील सुसंवाद मेळाव्यास लातूर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36

Latest news