22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeलातूरअजब त-हा... रस्त्यावर पाण्याचे कारंजे 

अजब त-हा… रस्त्यावर पाण्याचे कारंजे 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कामकाज कधी सुधरेल, हे सांगणे कठीणच.  या विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील रस्त्यावर चक्क कारंजे उडत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.  यंदा अतिवृष्टी झाली. लातूर शहराला पाणीपुरवठा होणारे मांजरा धरण काठोकाठ भरलेले आहे. पाणी टंचाईची तशी भिती नाही. परंतु, पाणी मुबलक आहे म्हणुन वाया घालवणे, शहाणपणाचे ठरत नाही. शहरात ज्या ज्या भागात नळाला पाणीपुरवठा होतो त्या त्या भागात लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सौजन्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिण्या नवीन टाकल्या तरी जलवाहिण्या फुटणे, लिकेज होण्याचे प्रमाण थांबलेले नाही. शहरातील सिग्नल कॅप परिसरातील श्री देशिकेंद्र विद्यालयाजवळ सिमेंट काँक्रीटच्या रोडच्या अगदी मधोमध जलवाहिणी फुटली. त्यातुन कारंजे उडावे, अशा पद्धतीने पाणी उडत आहे. याकडे अद्यापतरी पाणीपुरवठा विभागाचे लक्ष गेलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR