अजितदादांचे तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा ‘साखर’पर्व सुरू

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. या विजयाबरोबरच त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक लढवून त्यात विजय मिळवत अजितदादा तब्बल ४३ वर्षांनंतर संचालकपदावर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रिपदावर असताना साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णयही ऐतिहासिक ठरला.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहले म्हणजे स्वत: उपमुख्यमंत्री अजितदादा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले पॅनेल निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पहिला निकाल अजितदादांच्या पॅनेलच्या बाजूने लागला. खुद्द अजित पवारांनी विजय मिळवत पॅनेलची विजयी घोडदौड सुरू केली. त्यांनी ब वर्ग गटातून विजय मिळवत वैध १०१ पैकी तब्बल ९१ मते मिळवली. हा गट सहकारी संस्थांचा आहे. अजित पवारांचा हा विजय अपेक्षितच होता.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक संस्थांवर दादांचेच नेतृत्व आहे. त्यामुळे हा गट सर्वाधिक सुरक्षित गट मानला जातो. या गटात कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तो सहज निवडून आला असता. पण स्वत: अजितदादा निवडणूक लढवत असल्याने त्याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची दादांची ही दुसरी वेळ. पहिली निवडणूक त्यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची लढवली होती. खरंतर राजकीय आयुष्यातीलच त्यांची ही पहिली निवडणूक होती. १९८२ मध्ये झालेल्या या निवडणुकीत ते विजयी झाले आणि कारखान्याचे संचालक बनले. त्यानंतर तब्बल ४३ वर्षांनंतर ते एखाद्या कारखान्याचे संचालक बनले आहेत. त्याआधी १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले होते. जवळपास १६ वर्षे ते या पदावर होते.

आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी दादांची वाटचाल राहिली आहे. पण त्याची सुरुवात सहकारातून झाली होती. आता पुन्हा ४३ वर्षांनंतर ते साखर कारखान्याच्या संचालक पदावर विराजमान झाले आहेत. ‘अजितदादा म्हणजे पक्का वादा’ असे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आता ते कारखान्याचे संचालक झाल्याने माळेगावच्या प्रत्येक निर्णयाकडे सहकार क्षेत्राचे, प्रामुख्याने राज्यातील इतर साखर कारखान्यांचे लक्ष असणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news