कणखर नेता काळाने हिरावला
अजितदादा म्हणजे मनाचा राजा माणुस. दिलखुलास राजकारणी, हजारो, लाखो लोकांचे कल्याण करणारा एक महान नेता आपल्यातून गेला. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे खुप मोठे नूकसान झाले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. हे दु:ख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. माझ्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या वतीनेही अजितदादा यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
– लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके.
कणखर नेता काळाने हिरावला
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. सकाळी ७ वाजल्यापासून जनसेवा करणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेते अशी त्यांची ख्याती होती, त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणातील एक अभ्यासू, कणखर आणि प्रशासकीय पकड असलेले नेतृत्व काळाने आपल्यापासून हिरावून घेतले आहे. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. दादा त्यांच्या कार्यातून कायम स्मरणात राहतील. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर पवार कुटुंबियाना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
– लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव.
सर्वांना सोबत घेऊन जाणारे राजकारणी
अजितदादा यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मला मोठा धक्का बसला. सर्वांना सोबत घेऊन जाणारे राजकारणी, अशी त्यांची ओळख होती. दादांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. त्यांच्या अकाली जाण्याचे महाराष्ट्राचे मोठे नूकसान झाले. एक सच्चा नेता हरवल्याचे दु:ख आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पवार कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो, ही प्रार्थना.
– काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख.
सर्वसामान्यांचे आधारवड गेले
अजितदादा यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी फक्त धक्कादायक नसून मन सुन्न करणारी आहे. सर्वसामान्य माणसाचे आधारवड गेले. परके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. दादांना विनम्रपणे व आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या आत्म्यास शांती तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. – अॅड. व्यंकट बेद्रे.
दिलेला शब्द पाळणारे नेते
अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नूकसान झाले. एक सच्चा, काम करणारा नेता, दिलेला शब्द पाळणारे नेते, लहान, थोरांना सोबत घेऊन चालणाने नेते अजितदादा यांचे अकाली निधन मलाना चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आधार हरवला आहे. त्यांच्या आत्म्यास शांत मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. -मकरंद सावे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलदार नेतृत्व हरपले
अजित दादा म्हणजे सर्वांनाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बोलणारे व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा संघटनेचे आंदोलन होत असत त्या त्या वेळेला संघटनेच्या बैठका लावून त्यामधून मार्ग काढण्यामध्ये दादा सर्वात अग्रभागी असत. दादांनी नेहमी शेतक-यांच्या बाजूने न्याय देण्याचे काम केले. दादांच्या जाण्यामुळे सबंध महाराष्ट्रावर शोक कळा पसरली. आज पूर्ण दिवस उदास असे वातावरण आहे. महाराष्ट्राने दिलखुलास व्यक्तिमत्व गमावले. मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
– सत्तार पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना.
धडाडीचा नेता आपल्यातून गेला
अजितदादा एक कणखर, स्पष्ट वक्ता, धडाडीची निर्णय क्षमता असलेले नेते आज निघून गेले आहेत. जरी ते महायुतीत असले तरी त्यांच्यावर शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा पगडा होता. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. -अॅड. उदय गवारे.
अडचणीत कायम पाठीशी राहणारे नेते
अजितदादा यांचे निधन सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठी दु:खाची बाब आहे. दादा हे सर्वसामान्यांत राहणारे नेते होते. मी गेली २० वर्षे त्यांच्यासोबत काम करीत आहे. अडचणीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहणारे ते नेते होते. दलित, मुस्लिमांना सोबत घेऊन चालणारे ते नेते होते. आदरणिय विलासराव देशमुख, जयंतराव पाटील यांच्यानंतर महाराष्ट्राची संपूर्ण माहिती असणारे ते एकमेव नेते होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. – माजी नगरसेवक राजा मणियार.
ऊर्जावान नेता आपल्यातून गेला
अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राचे फार मोठे नूकसान झाले. अत्यंत ऊर्जावान नेता आपल्यातून अकाली गेला. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र सून्न झाला आहे. आम्ही पोरके झाले आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– अॅड. बळवंत जाधव.
गोर, गरिबांचा नेता हरपला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचे निधन मनाला खुप वेदना देणारे आहे. गोर, गरिबांकडे लक्ष देणारे नेते आज आपल्यातून निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नूकसान झाले. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
-सय्यद ईब्राहीम.
स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे अजितदादा
सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा नेत म्हणजे अजितदादा. दिलेला शब्द पाळाणारा नेता म्हणजे अजितदादा आणि स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे अजितदादा. कार्यकर्त्यांविषयी आपलेपणा जपणारे नेते अजितदादा यांचे अकाली निधन मनाला धक्का देणारे आहे. दादा सामान्य कार्यकर्त्यांचा आधार होते. अजितदादांच्या आत्म्यास शांती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-मदन धुमाळ.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता
अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राचे फार मोठे नूकसान झाले. कोणताही विषय तडीस नेणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. प्रशासनावर मजबुत पकड असलेले ते नेते होते. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे ते नेते होते. माझ्यावर दोन वेळा हल्ला झाला त्या दोन्ही प्रसंगात अजितदादांनी मला खुप मदत केली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, हीच प्रार्थना. -संजय शेटे.
राजकारणातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आले
महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ ठसा उमठविणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि निर्णायक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे बारामती विमानतळाजवळील विमान अपघातात अपघाती निधन झाले. त्यांनी लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री या पदावर कार्य केले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा आणि ग्रामीण विकास यासारखी खाती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात जलव्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व त्यांनी दिले. पहाटे लवकर उठून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम होती. सात वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून प्रशासनावरील त्यांचा वचक आणि राजकारणातील दबदबा सर्वश्रूत होता. त्यांचा विमान अपघातामुळे अपघातील मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आलेले आहे
-माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर.
हक्काचा दादा आपल्यातून गेल्याने महाराष्ट्र पोरका झालायं
आजची सकाळ महाराष्ट्रासाठी मनसुन्न करणारी बातमी घेऊन आली. उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे निधन झाले. आपला वाटणारा हक्काचा लाडका ‘दादा’ पोरकं करून कायमस्वरूपी नॉट रिचेबल झाले. दादा वेळेचे पक्के होते. पहाटे कामाला सुरुवात करणारे आज सकाळीच सर्वांना अचानकपणे सोडून गेले. कार्यकर्त्यांचे हक्काचा आधारस्तंभ अजितदादा होते. त्यांच्या जाण्यानं तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली.
-डी. उमाकांत

