21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर.......व्हीडीओ बघा

अजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर…….व्हीडीओ बघा

पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमानअपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. या अपघातातअजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अपघातानंतरचा विमानाचा चक्काचूर झाल्याचा व्हीडीओ समोर आला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळले, अशी माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR