अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

परभणी : शहरातील जालना रस्त्यांवरील मालेगाव पाटी परिसरात दि. २५ जुलै रोजी मध्यरात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुचाकीस्वारावर ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. परंतू जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोत शेळके येथील रहिवासी असलेले विष्णू अशोक फड जिंतूरहून मंठ्याकडे दुचाकीवरून शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास जात होते. मालेगावपाटी जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते. १०८ रुग्णवाहिका चालक एकनाथ पवार व डॉ. अरुण लाहोटी, नागेश आकात यांनी त्यांना पाहताच तात्काळ घटनास्थळावरुन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अजीस यांनी प्राथमिक उपचार केले.

जखमी फड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून वाहनांसह फरार झाला आहे. याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत पोलिसांत कोणतीही नोंद झाली नव्हती.

दरम्यान परभणी ते छ. संभाजीनगर जाणा-या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेषत: जिंतूर ते परभणी महामार्गावर सातत्याने घडणा-या अपघातांच्या घटनामुळे वाहन चालक जीव मुठीत घेवून वाहने चालवित आहेत. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक उभारल्यास वाहनांचा वेग कमी करण्यास मदत होईल. तसेच वाहतूक पोलिसांनी सातत्याने या महामार्गावर लक्ष ठेवल्यास अपघात टळू शकतात. तसेच रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news