22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रअझरुद्दीन, राज बब्बर, रेवंथ रेड्डी, सचिन पायलट, आमदार अमित देशमुख काँग्रेसचे स्टार प्रचारक

अझरुद्दीन, राज बब्बर, रेवंथ रेड्डी, सचिन पायलट, आमदार अमित देशमुख काँग्रेसचे स्टार प्रचारक

 

महापालिका निवडणूक, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबइ : प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, मोहम्मद अझरुद्दीन, राज बब्बर आदींचा समावेश आहे. या शिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कन्हैया कुमार, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून जाहीर केले.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री नसीम खान, यशोमती ठाकूर, अमीन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम, भाई जगताप, अनिस अहमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, आमदार जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुजफ्फर हुसेन, एम. एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि हनुमंत पवार यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR