26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeपरभणीअटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी पद्माकर केदार यांची नियुक्ती

अटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी पद्माकर केदार यांची नियुक्ती

परभणी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर आधारित सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य करणा-या अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंह यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या सक्रिय नेतृत्वात रेणापूर तालुक्यातील व्होटी येथील पद्माकर केदार यांची फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात दि.५ रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री – संघटन हेमंत पाटील गोढाळकर यांच्या हस्ते केदार यांना हे नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आले. प्रदेश मंत्री म्हणून केदार यांच्यावर आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदर्श विचारांना महाराष्ट्रातील तरुणाईपर्यंत पोहोचवण्याची आणि फाउंडेशनचे संघटन संपूर्ण राज्यात अधिक व्यापक व मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल.

विशेषत: सामाजिक सेवा, ग्रामीण विकास आणि शैक्षणिक उपक्रमांना बळ देण्याच्या दिशेने ते काम करतील. केदार यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष वेंकटेश कमळू, छ. संभाजीनगर अध्यक्ष गणेश राऊत, बी.के. जोशी आदी मान्यवर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR