वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
ट्रम्प हे आता युद्धाची नवी आघाडी उभारत असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रीनलँडजवळ अमेरिकन सैन्याच्या हालचाली वाढल्याची माहिती समोर येत आहे.एका रिपोर्टनुसार अमेरिकेने ग्रीनलँडजवळ न्यूक्लियर कमांड विमाने तैनात केले आहेत. अॅटलांटिकमध्ये अमेरिकेने न्यूक्लियर कमांड विमाने तैनात केल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रम्प यांची सुरुवातीपासूनच ग्रीनलँड आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा आहे, त्यांनी त्याबाबत अनेकदा वक्तव्य देखील केले आहे, आपल्या मनातील इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. आता ट्रम्प यांनी आपला ग्रीनलँन्ड प्लॅन अॅक्टिव्ह केल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत आणि अटलांटिक महासागरात मर्करी विमानाने उड्डाणं केले आहे. हे अमेरिकेचं एक बलाढ्य न्यूक्लियर कमांड विमान आहे. त्यामुळे आता आणखी एका मोठ्या युद्धाचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँड आमच्या ताब्यात घेऊ, आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँडची गरज आहे, आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँड महत्त्वाचे आहे. ग्रीनलँडला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ताब्यात घेऊ असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

