लातूर : प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा तलवार आणि कोयत्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याजासह पैसे परत करुनदेखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने चार जणांनी एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना रिंगरोडवरील नाईक चौकात घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश जीतेंद्र सारगे वय २८ वर्षे व्यवसाय-इलेक्ट्रीशियन रा. एल.आय. सी कालनी, याने मनोज धोत्रे याच्याकडुन यापुर्वी पैसे उसणे घेतले होते. त्याचे घेतलेले पैसे परत केले होते. परंतु तो नेहमीच हातउसणे घेतलेल्या पैश्याचे व्याज दे, असे म्हणुन पैसे मागत असे. काल दि. ४ रोजी रात्री ९.२५ वाजण्याचे सुमारास नागेश सारगे यास मनोज धोत्रे याने शुभम तुमकुटे याचे मोबाइलवरून फोन करून तु कोठे आहेस मला तुला भेटायचे आहे, असे म्हणाल्याने त्यांनी त्यास नाइक चौकातील डी स्टार डान्स स्टुडीओच्या समोर आहे, असे सांगीतले असता थोड्याच वेळात तेथे मनोज धोत्रे, अमोल टोंपे व एक अनोळखी इसम हे शुभम तुमकुटे याच्या दुचाकीवर आले. व मनोज धोत्रे याने नागेश सारगे यास मी दिलेले पैसे परत दे, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा नागेश सारगे यांनी त्यास शिवीगाळ का करत आहेस, असे म्हणटले असता मनोज याने धक्काबुक्की करण्यास सुरवात केली.
तेव्हा नागेश सारगे यांनी त्यास धक्का दिला असता मनोज हा रोडचे बाजुस गेला तेव्हा मनोज धोत्रे याने बाजुस असलेल्या त्याच्या मित्रास तलवार घेरे ती असे म्हणून ओरडले. अमोल टोंपे व एक अनोळखी इसम हे नागेश सारगे याच्या अंगावर धावून येऊन लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरवात केली व मनोज धोत्रे याने तलवारीने, अमोल टोंपे याने तलवारीचे कव्हरने व अनोळखी इसमाने दगडाने सारगेच्या डाव्या पायाच्या मांडीवर, पिंडरीवर, घोट्याजवळ व उजव्या पायाच्या नळीवर मारूण जखमी केले. सदरील घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी नागेश सारगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा अधिक तपास सपोनि जिरगे हे करीत आहेत.

