अतिवृष्टी, पूर परिस्थितीत मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात (परांडा तालुक्यातील मौजे लाची) येथे झालेल्या पावसामुळे १२ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी नाशिकवरून एअर फोर्सचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे येथील एक पथक रवाना करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) धुळे येथील एक पथक पाठवण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे (सिंदफना नदी परिसर) या ठिकाणच्या नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी नगरपालिका बीड यांच्याकडील बोट पाठविण्यात आली. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे एक पथक शोध व बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सिना आणि भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे एक पथक रवाना व नगरपालिका बार्शी अग्निशमन दलाची बोट घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. तसेच सीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सचेत अ‍ॅप मधून सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चार गावे पूरग्रस्त असून हिवरा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने मदत व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठवण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणा-या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

संपर्क :- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव- ०२४७२-२२७३०१,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र अहिल्यानगर- ०२४१-२३२३८४४,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र बीड – ०२४४२-२९९२९९,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र सोलापूर- ०२१७-२७३१०१२,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जळगाव -०२५७-२२१७१९३/२२२३१८०

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news