21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeमनोरंजनअदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

मुंबई : वृत्तसंस्था
संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ या वेबसीरीजमुळे अदिती राव हैदरी प्रचंड चर्चेत आली. अदिती राव हैदरीने मार्च महिन्यात अभिनेता सिद्धार्थ सोबत कोणताही गाजावाजा न करता साखरपुडा केला होता. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गणोशोत्सवाच्या शुभमुहुर्तावर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अफवाही पसरत होत्या. मात्र दोघांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवाय त्यांच्या नात्याबाबतही त्यांनी कोणता खुलासा केला नव्हता. मात्र आता अदितीने स्वत: लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

लग्नाच्या फोटोंमध्ये हे जोडपे पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. यामध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. या दोघांनी एका मंदिरात सात फेरे घेतले असून यावेळी कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार लग्नाला उपस्थित होता. लग्नानंतर घरातील वडीलधारी मंडळीही नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना या फोटोमध्ये दिसत आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांकडून सोशल मिडीयावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR