लातूर : येथील आयकर कार्यालयात अधिकारी असलेले कृष्णकुमार सन्मुखराव यांचा त्याच्या मुलानेच राहत्या घरी चाकु पोटात खुपसून खुन केला. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने लातूरात खडबड उडाली.
आयकर विभागातील अधिकारी कृष्णकुमार सन्मुखराव हे अहमदपूर तालुक्यातील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी लातूर शहरापासून जवळच असलेल्या खोपेगाव शिवारात प्लॉट घेवुन नुकतेच घर बांधले आहे. ते घरी असताना त्यांचा मुलगा शंतनू कृष्णकुमार सन्मुखराव याने वडील कृष्णकुमार सन्मुखराव यांच्या पोटात धारधार चाकु खुपसला. यात कृष्णकुमार गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

