मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (३० जून) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात १२ विधेयके मांडली जाणार आहे. मात्र त्याचपूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधान भवनाच्या पाय-यांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलन सुरु केले आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत कम ऑन किल मी म्हटले होते. त्याच्या खिल्ली उडवत शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा देत होत.
शिवसेनेच्या ५९ व्या स्थापनादिनाच्या दिवशी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते की, कम ऑन किल मी,असं म्हटलं होते. यावर शिंदे यांनी तर उद्धव यांना लक्ष्य करत म्हटले आहे की, ‘मेलेल्या माणसाला मारण्याची काय गरज आहे ’ असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. या टिकेनंतर शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधान भवनाच्या पाय-यांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलन सुरु केले आहे.
तसेच या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा अभ्यास सुरू करण्यास वाढत्या विरोधाला तोंड देत, राज्य मंत्रिमंडळाने रविवारी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचे दोन जीआर (सरकारी आदेश) मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जीआर मागे घेण्यात आले आहेत.