21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमनोरंजनअनिल कपूरने नाकारली पान मसालाची जाहिरात

अनिल कपूरने नाकारली पान मसालाची जाहिरात

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमधील अनेक आघाडीचे अभिनेते पान मसालाची जाहिरात करताना दिसतात आणि ट्रोल होतात. अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ या कलाकारांवर टीका झाली आहे. ट्रोलिांगनंतर अक्षय कुमारने माफी मागत अशा जाहिराती करणं बंद केले. तर आता नुकतंच अनिल कपूरनेही पान मसालाच्या जाहिरातीला नकार दिला आहे. त्याने कोटींची ऑफर नाकारली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अनिल कपूरने एका बड्या पान मसालाच्या जाहिरातीला नकार दिला आहे. आपली चाहत्यांप्रती आणि प्रेक्षकांप्रती जबाबदारी आहे याचं भान राखत त्याने जाहिरातीची ऑफर नाकारली. कितीही पैसे मिळत असले तरी लोकांच्या आरोग्याला धोका असेल अशा कोणत्याही प्रोडक्टचा प्रचार करणार नाही असं तो म्हणाला.

अनिल कपूर वयाच्या ६७ व्या वर्षीही एकदम फीट आहे. त्याचे लूक्स पाहून तो आणखी तरुण होत चालला असल्याची प्रतिक्रिया अनेक जण देतात. हेल्दी डाएट आणि लाईफस्टाईटलला तो प्रमोट करतो. त्यामुळे तो अगदी विचारपूर्वक ब्रँड एन्डॉर्समेंट्स करतो. कोणालाही नुकसान पोहोचेल अशा गोष्टींची तो कधीही जाहिरात करत नाही.

दुसरीकडे बॉलिवूड कलाकार पान मसालाच्या जाहिरातींमुळे ट्रोल होत असतानाच दाक्षिणात्य कलाकारांनी आजपर्यंत कधीच असे प्रोडक्ट प्रमोट केले नाहीत. रजनीकांत, कमल हसन यांनी करिअरच्या सुरुवातीलाच अशा जाहिराती न करण्याचा निश्चय केला होता. यानंतर सर्वच कलाकारांना हा नियम फॉलो केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR