23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeमहाराष्ट्रअभिषेक कळमकरवर आणखी एक गंभीर आरोप

अभिषेक कळमकरवर आणखी एक गंभीर आरोप

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून अभिषेक कळमकर याने बलात्कार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असतानाच आणखी एका युवतीने तोफखाना पोलिसांकडे कळमकरविरोधात तक्रार केली आहे.

अभिषेक कळमकर याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात पुन्हा आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार एका युवतीचीच आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने कळमकर याने आपल्याशी गैरवर्तन केले असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या वेळी कळमकर याच्याशी ओळख झाली. मागच्या महिन्यात बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानाजवळ भेटला. त्याने कॉफी पिण्याच्या बहाण्याने एका पांढ-या रंगाच्या गाडीत बसवून नेले. त्यानंतर नको तिथे हात लावून त्याने गैरवर्तन केले, असे युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

अभिषेक कळमकर याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता तोफखाना पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी कळमकर याच्या घराची काल झडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर पसार आहे. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर आहेत.

पीडित युवतीला नगर शहरातील विविध ठिकाणी, तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर इथल्या एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. मोबाईलवर व्हीडीओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासन्तास त्रास दिल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR