14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रअमरावतीत चक्क २४ कॅरेट सोन्याची वर्ख मिठाई विक्रीस !

अमरावतीत चक्क २४ कॅरेट सोन्याची वर्ख मिठाई विक्रीस !

प्रतिकिलो २१ हजार रुपये दर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

अमरावती : प्रतिनिधी
दिवाळीचा सण आणि गोडधोड पदार्थ यांचे अतूट नाते आहे. मात्र यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने गोडीत सोनेरी भर घातली आहे. देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी ख-या २४ कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजलेली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तर एक कलाकृती आहे.
निवडक आणि उच्च दर्जाच्या सुकामेव्यासह पिस्ता, मामरा बदाम, केशर आणि हेजलनटसारख्या घटकांनी बनवलेली ही मिठाई खास वर्गासाठी आकर्षण ठरली आहे.

या मिठाईची किंमत ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. या एक किलो मिठाईसाठी तब्बल २१ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एवढी महाग मिठाई असूनदेखील खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR