लातूर : प्रतिनिधी
जगभरात आपल्या दर्जेदार उत्पादनातून सर्वांच्या मनात घर केलेल्या अमुल या ब्रँडने मराठवाड्यातदेखील सर्वांची पसंती मिळवली असून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. ला डेअरी लिसीअस व्हॅचर प्रा. लि., बाभळगाव येथे ला डेअरीचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने अमुल कंपनीची विविध उत्पादने ९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू करण्यात आली.
सगळीकडे भेसळयुक्त दुधाची विविध उत्पादने मिळत आहे, अशी ओरड नागरिकांकडून होत असताना त्याला अपवाद ठरत अमुलकडून दर्जेदार व पोषक असे दूध पुरवले जात आहे त्यामुळेच आज ३० हजार लिटर प्रती दिन विक्री दुधाची होत आहे. सुरुवातीला केवळ ८ हजार लिटर एवढी विक्री होत होती. विक्रीमध्ये झालेली वाढ ही निश्चितच ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक मानले जात आहे.
आपल्या मराठवाड्यातील शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायातून अधिकचा आर्थिक लाभ मिळावा यासाठी साबर डेअरीला लागणारे योग्य ते सहकार्य आपण करणार, असे प्रतिपादन ला डेअरीचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे. अमुलशी करार झाल्यानंतर गुणवत्तेशी कसलीही तडजोड न करता ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ पोहोचतील यासाठी भविष्यात पण अशाच पद्धतीने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. मागील २ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज हे यश मिळाले आहे. यासाठी प्रयत्नशील असणारे अमुलचे अधिकारी, साबर डेअरीचे अधिकारी व ला-डेअरीचे सर्व अधिकारी यांचे अभिनंदन चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

