वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारले असून अनेक लोकांना अमेरिकेतून बाहेर काढले. यामुळे लाखोंच्या घरात लोकांवर बेरोजगारीची वेळ आली. अमेरिकेत स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील स्थलांतरितांच्या ५० वर्षात पहिल्यांदा इतकी मोठी ५० टक्क्यांची घट झाली आहे.
रिसर्च सेंटरच्या मते, जानेवारी २०२५ मध्ये ५३.३ टक्क्यांपेक्षाही जास्त ही संख्या आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाने लादलेले कडक नियम हे महत्वाचे कारण आहे. मोठ्या प्रमाणात हद्दपारी, व्हिसा आणि आश्रय धोरणांमध्ये बदल यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, जवळजवळ १.६ दशलक्ष स्थलांतरितांनी देश सोडला. हा आकडा अत्यंत मोठा नक्कीच म्हणावा लागेल. १४ लाख लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
यापैकी काही लोकांनी स्वत:च्या इच्छेने देश सोडला आहे तर काहींना बाहेर काढण्यात आले. एप्रिल ते जून या कालावधीत, ‘आयसीई’ने ३,५९,००० हून अधिक लोकांना अटक केली आणि ३,३२,००० लोकांना हद्दपार केले आहे.
सर्व व्हिसा धारकांचे पुनर्मूल्यांकन
सर्व व्हिसा धारकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल आणि जर कोणत्याही अटीचे उल्लंघन आढळले तर व्हिसा रद्द केला जाईल, असे सांगितले आहे. कॅलिफोर्नियामध्ये आयसीईच्या अहवालानुसार, २० ते ४० टक्के कृषी कामगारांचे नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प जास्तीत जास्त विदेशी लोकांना आपल्या देशातून बाहेर काढताना दिसत आहेत. हेच नाही तर अलिकडील अपघातानंतर नवीन चालक व्हिसा देणे सुद्धा त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
















