अमेरिकेचा इराणच्या ९० ठिकाणांवर हल्ला

तेल अवीव : इराणने कतार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले आहेत. इराणी सैन्यानुसार, या हल्ल्यांमध्ये कुवेतच्या पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीला, कतारच्या अर्ली वॉर्निंग सॅटेलाइट अँटेनाला आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्याच्या इंधन टाकीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांसाठी मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करण्यात आला.

यापूर्वी अमेरिकेने इराणवर सलग दुस-या दिवशी मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने सुमारे ९० लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला. या हल्ल्यांमुळे इराणच्या अहवाजमध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणी सैन्याने सांगितले की, ते अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत राहील. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणला करार हवा आहे, परंतु तेहरान कराराचे पालन करेल यावर त्यांना विश्वास नाही.

काय घडले २४ तासांत?
इराणच्या ९० ठिकाणांवर हल्ले
अमेरिकन सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा इराणच्या ९० हून अधिक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेने सांगितले की, इराणच्या होर्मुजमधील जहाजांवरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे करण्यात आले आहे.

इराणसोबतची शस्त्रसंधी संपली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेदरम्यान सांगितले की, इराणसोबत झालेला शस्त्रसंधी करार आता संपुष्टात आला आहे आणि आता त्यांना इराणसोबत कोणताही करार करायचा नाही.

बहरीन आणि कुवेतमध्ये ८५ ठिकाणांना लक्ष्य
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दावा केला की, त्यांनी बहरीन आणि कुवेतमध्ये ८५ अमेरिकन लष्करी ठिकाणांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले. यात अमेरिकेचे फिफ्थ फ्लीट मुख्यालय आणि अली अल-सलेम एअर बेसचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेशी पुढील चर्चा होणार नाही
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, धमक्यांच्या वातावरणात अमेरिकेशी कोणतीही चर्चा किंवा करार होणार नाही, आधी अमेरिकेला जुन्या करारांचा सन्मान करावा लागेल.

भारतीय ध्वजांकित जहाज परतले
सीएनएननुसार, होर्मुझमधील वाढत्या तणावानंतर कुवेतचे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणारे भारतीय ध्वजांकित टँकर ‘लीला वादिनार’ बुधवारी होर्मुझ स्ट्रेटजवळ ओमानच्या किना-यावरून परतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news