26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेच्या राजकारणात भूकंप

अमेरिकेच्या राजकारणात भूकंप

एपस्टीन फाईल्स अखेर उघड, दिग्गजांचे तरुणींसोबतचे फोटो व्हायरल
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील लैंगिक शोषणातील दोषी जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित फाईल्स अखेर उघड झाल्या आणि अमेरिकेच्या राजकारणात अपेक्षित भूकंप आला. त्याचे हादरे युरोप आणि आशियापर्यंत बसले. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन, राजपूत्र, इतर देशांचे काही नेते यांच्यासह जगातील अनेक मान्यवरांसोबत तरुणींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यादरम्यान काही तरुणींच्या अंगावरील मजकूर, अश्लील संदेश, मुलींचे रेटकार्ड आणि इतर अनेक बाबी समोर आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जेफ्री एपस्टीन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगले मित्र होते. दरम्यान, अनेकांची नावे, फोटो जाहीर न केल्याने अमेरिकन नागरिकांनी न्याय विभागावर टीका केली.

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याविषयीच्या विधयेकावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर एका महिन्यात या फाईल सार्वजनिक करण्यात येणार होत्या. १९ डिसेंबर २०२५ रोजी त्या सार्वजनिक झाल्या. यामुळे कालपासून अमेरिकेत वादळ उठले आहे. एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी कायद्याअंतर्गत हजारो पानांचा दस्तावेज, शेकडो फोटो, ई-मेल्स, अश्लील संदेश, विविध देशातील तरुणींचे रेटकार्ड, काही कोड वर्ड आणि इतर मोठ्या साहित्याचा या सार्वजिक दस्तावेजात समावेश आहे.

मसाजच्या नावाखाली
देहविक्रयात ढकलले
जगातील दिग्गज अनेक तरुणींसोबत या फोटोत दिसत आहेत. यातील अनेक तरुणी या रशिया, अमेरिका आणि युरोपातील आहेत. मसाजच्या नावाखाली त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आल्याचे दिसून येते. यामध्ये लहान मुलींचे पण लैंगिक शोषण करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

एपस्टीन फाईल्स
अय्याशींचा अड्डा!
जेफ्री एपस्टीनशी संबंधित नव्याने उघड झालेल्या कागदपत्रांमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय खळबळ उडाली आहे. या फायलींमध्ये अनेक उच्च-प्रोफाइल व्यक्तींची नावे आणि छायाचित्रे उघड झाली आहेत. फाईल्स ओपन होताच खळबळ उडाली असून अनेक मोठे नेते अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांचेही या प्रकरणात नाव समोर आले आहे, त्यांचा फोटोही समोर आला आहे. या फाईल्स म्हणजे अय्याशींचा अड्डा आहे.

एपस्टीन फाईलींची
संख्या ३.५ हजारांवर
एपस्टीन फायलींमध्ये जवळपास ३,५०० हून अधिक फाईल्स असून २.५ जीबी डेटाच्या या फाईल्स असल्याची माहिती समोर येत आहे. या दस्ताऐजात छायाचित्र, मेल, चौकशीच्या नोट्स आणि इतर रेकॉर्डचा समावेश आहे.छायाचित्रामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या अनेक फोटोंचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR