25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत महागाईमुळे हाहाकार! किराणापासून सर्वच वस्तूंच्या दरवाढीमुळे असंतोष

अमेरिकेत महागाईमुळे हाहाकार! किराणापासून सर्वच वस्तूंच्या दरवाढीमुळे असंतोष

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत किराणा मालापासून रोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत, सर्वच किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अनेक खाद्यपदार्थांवर लावलेले टॅरिफ मागे घेतले. हा निर्णय केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी मोठी आशा निर्माण करतो.

ट्रम्प प्रशासनाने घोषणा केली की टोमॅटो, केळी सह डझनावारी खाद्य उत्पादनांवर लावलेले हेवी इम्पोर्ट ड्युटी परत घेण्यात येत आहे. टॅरिफ महागाई वाढवत नाहीत. मात्र, वाढत्या किमती आणि ग्राहकांचा असंतोष यामुळे परिस्थिती बदलली आहे, असा दावा ट्रम्प करीत होते.

फळे-भाज्यांच्या किमती गगनाला : अमेरिकेत कॉफी, टोमॅटो आणि केळीसारख्या रोजच्या वस्तूंचे दर झपाट्याने वाढले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत ग्राउंड बीफच्या किमती १३% आणि स्टेकच्या किमती १७% पर्यंत वाढल्या होत्या, जो तीन वर्षांतील सर्वात मोठा वाढीव दर आहे. तर, केळी ७% ने महाग झाली आणि टोमॅटोच्या किमतीत १% वाढ झाली आहे. एकूणच, घरी खाल्ल्या जाणा-या वस्तूंच्या किमती २.७% नी वाढल्या आहेत.

ट्रम्पवर निवडणुकीचा दबाव : ट्रम्प सरकारवर निवडणुकांचा दबाव देखील वाढू लागला होता. व्हर्जिनिया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अलीकडील स्थानिक निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सचा विजय आणि लोकांची नाराजी यामुळे महागाई हा एक मोठा मुद्दा बनला होता. याच कारणामुळे, ट्रम्प यांनी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.

व्यापार करारावर वाद : अमेरिकेने अर्जेंटिना, इक्वाडोर, ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोर या देशांसोबत व्यापार कराराच्या दिशेनंही पाऊल टाकलं आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या देशांतून येणा-या अनेक खाद्य उत्पादनांवर आयात कर पूर्णपणे हटवला जाईल. मात्र, विरोधी डेमोक्रॅट नेते रिचर्ड नील यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ट्रम्प प्रशासन तीच आग विझवत आहे, जी त्यांनी स्वत: लावली होती, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR