15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत शटडाऊनमुळे सरकारी नोकरदारांना धोका

अमेरिकेत शटडाऊनमुळे सरकारी नोकरदारांना धोका

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सध्या अमेरिकेत शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अनेक शासकीय कर्मचा-यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. शटडाऊनमुळे शासकीय कार्यालयांना वित्तपुरवठा होत नाही. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढवणारा एक इशारा ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे स्पिकर माईक जॉन्सन यांनी दिला आहे. त्यांनी केलेले हे विधान खरे ठरले तर सरकारी नोकरांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पक्षाचे स्पिकर माईक जॉन्सन यांनी अमेरिकेतील हा सर्वात मोठा शटडाऊन ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. जोपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आरोग्यासंदर्भातील तरतुदींचा आपला हट्ट सोडणार नाहीत, जोपर्यंत निधी वितरण सुरू होत नाही तोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होणार नाही,

असेही जॉन्सन यांनी सांगितले. सध्या अमेरिकेत शटडाऊनचा १३ वा दिवस आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांनी या शटडाऊनच्या काळात भविष्यात मोठी नोकरकपात होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकारी नोकरदार वर्गामध्ये सध्या अस्वस्थता आहे. सरकारतर्फे वित्तीय पुरवठाच होत नसल्याने आता वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.

वेगवेगळी वस्तूसंग्रहालये, सांस्कृतिक भावबंध जपणा-या संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. विमानतळावरही या शटडाऊनचा परिणाम दिसतो आहे. या शटडाऊनमुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR