25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेवर अस्थिर कर्जाचा बोजा वाढला! मस्क संतापले

अमेरिकेवर अस्थिर कर्जाचा बोजा वाढला! मस्क संतापले

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेवरील अस्थिर कर्जाच्या बोजा वाढत असल्यामुळे इलॉन मस्क यांनी थेट संसदेत ट्रम्प सरकारच्या कर विधेयकाबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अमेरिकेच्­या संसदेमधील हे एक खर्चाने भरलेले, हास्यास्पद आणि लज्जास्पद विधेयक आहे. माफ करा, पण मी आता ते सहन करू शकत नाही, अशा शब्­दांमध्­ये उद्योगपती एलन मस्क यांनी ट्रम्­प सरकारने सादर केलेल्­या नवीन कर विधेयकावर हल्­लाबोल केला.

मस्­क यांनी ‘एक्­स’वर केलेल्­या पोस्­टमध्­ये म्­हटलं आहे की, सरकारने सादर केलेले नवीन कर विधेयक हे खर्चाने भरलेले आणि हास्­यास्­पद आहे. ज्­या मतदारांनी विद्­यमान सरकारच्­या बाजूने मतदान केले त्­यांना आता स्वत:ची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की त्यांनी चूक केली आहे. हे विधेयक ‘घृणास्पद’ आहे. त्­यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. माफ करा, पण मी आता ते सहन करू शकत नाही….

२.५ ट्रिलियन डॉलर्सची तुट
मस्क यांनी इशारा दिला की, ट्रम्­प सरकारने सादर केलेल्­या नवीन कर विधेयकामुळे अमेरिकेची यापूर्वीच असणारी प्रचंड अर्थसंकल्पीय तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. यामुळे देशावरील अस्थिर कर्जाचा भार आणखी वाढेल. दरम्­यान, काही दिवसांपूर्वी मस्­क यांनी अमेरिका सरकारच्­या सरकारी कार्यक्षमता विभाग ( डीओजीई ) च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नवीन कर विधेयकापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR