21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeराष्ट्रीयअर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू

अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू

संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर कर आहेत. त्या सलग आठ वेळा अर्थसंकल्प सादर करणा-या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत आणि इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणा-या दुस-या महिला आहेत.

त्यांनी २०१९ मध्ये त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी अनेक खास क्षण घडले, ज्यांची आजही चर्चा होते. मग तो अर्थमंर्त्यांनी दिलेले सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण असो किंवा त्यांची मधुबनी पेंटिंग साडी.

सीतारामन यांनीच ब्रीफकेसमधून अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा संपवली आणि टॅबलेट अर्थसंकल्पाची सुरुवात केली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संत रविदासांचे नाव घेऊन भाषणाची सुरुवात केली. अर्थमंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, दारिर्द्य निर्मूलनापासून ते रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांवर भर दिला. रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR