अर्शदीप सिंग झाला ‘क्लीन बोल्ड’!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने अभिनेत्री व मॉडेल समरीन कौर हिच्यासोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून क्रीडा आणि मनोरंजन विश्वात त्यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

अर्शदीपने सोशल मीडियावर समरीनसोबतचे फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, अचानक प्रकाशझोतात आलेल्या समरीन कौरबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सौंदर्य स्पर्धांपासून ते चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हीडीओंपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या समरीनचा प्रवास अत्यंत रंजक आहे.

अर्शदीप सिंगने समरीनला आलिंगन दिलेले दोन खास फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध केले. या छायाचित्रांना ‘माय पर्सन’ (माझी हक्काची व्यक्ती) असे मर्मस्पर्शी कॅप्शन देत त्याने प्रथमच आपले नाते जाहीरपणे स्वीकारले. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

७ सप्टेंबर १९९९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेली समरीन कौर ही एक यशस्वी अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिने पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्समधून बी.कॉम (ऑनर्स) या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१८ मधील ‘फेमिना मिस इंडिया’ या नामांकित सौंदर्य स्पर्धेत समरीनने जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीपर्यंत (फायनालिस्ट) मजल मारली होती. या प्लॅटफॉर्मने तिला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. येथूनच तिच्या मॉडेलिंगच्या कारकीर्दीला ख-या अर्थाने गती मिळाली आणि पुढे जाऊन तिच्यासाठी अभिनयाचे दरवाजे उघडले गेले.

समरीनने ‘जी-फाईव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नेल पॉलिश’ या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘८३’ आणि ‘सरदार जी २’ या लोकप्रिय चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. जुबिन नौटीयाल, बादशाह आणि गुरू रंधावा यांसारख्या आघाडीच्या गायकांच्या गाण्यांमध्ये तिने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. विशेषत: ‘बावला’ आणि ‘तुझे भूलना तो चाहा’ या म्युझिक व्हीडीओजमुळे तिची लोकप्रियता घराघरांत पोहोचली. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून, आपल्या कामाविषयीची माहिती, प्रवास आणि फॅशनशी संबंधित अपडेट्स ती चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते.
अर्शदीप आणि समरीनच्या नात्याचा प्रवास
आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान अर्शदीप आणि समरीन यांच्यातील नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. एका व्हायरल स्नॅपचॅट पोस्टमध्ये अर्शदीप एका तरुणीचा हात धरलेला दिसला होता, ती तरुणी समरीनच असल्याचे नेटिझन्सने तर्क लावले होते. समरीनच्या सोशल मीडिया छायाचित्रांमधील टॅटू, कपडे आणि ऍक्सेसरीजची अर्शदीपच्या चित्रांशी तुलना करून चाहत्यांनी त्यांच्यातील नात्याचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news