लातूर : प्रतिनिधी
अल्लाह, मोहापाई, इर्षेपाई, द्वेषापाई कळत, न कळत आमच्याकडून असंख्य चुक झाल्या आहेत. या चुकांमुळेच आज सर्वत्र अशांतता पसरली आहे. द्वेष पराकोटीला पोहोंचला आहे. माणुस म्हणून जगताना या सर्व गोष्टी अस होत आहेत. चुका करणा-या मुलाला आई आपल्या पदरात घेते. अल्हा तुम्ही तर आपल्या मखलुखवर आईपेक्षाही जास्त प्रेम करणारे आहात. आमच्या चुका माफ करा, सर्वत्र सुख, शांती आणि सौहादय निर्माण करण्यासाठी अल्हा; आपके रहेमत की जरुरत है, अशी प्रार्थना हजरो मुस्लिम बांधवांनी दि. २१ मार्च रोजी सकाळी १०.५ वाजता ईद-उल-फित्रनिमित्त येथील ईदगाहवर केली.
लातूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. लातूर शहरातील ईदगाहवर सकाळी ९.३० वाजता मुफ्ती ओवेस यांच्या मागे ‘ईद-उल-फित्र’ची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागीतला. दोन्ही हात उचलून मनापासून गहिवरुन अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. तत्पुर्वी मुफ्ती ओवेस यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगीतलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगीताना त्यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी दुआ मागीतला. या अल्हा, हम आपके नेक बंदे है, आप बेहतरीन कारकाज है, हमे माफ किजीए. सर्वांच्या जिवीताची रक्षण कर, कायनात में अमन और सुकून अता फरमाईये, आजारी असणा-यांना शिफा द्यावी, कर्जात बुडालेल्यांना कर्जातून मुक्त कर, अन्याय, अत्याचार करणा-यांना सद्बुद्धी दे, रहम फरमाईये या अल्हा रहम फरमाईये, अशी प्रार्थना केली.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्शी ईद-उल-फित्रचा उत्साह दिसुन येत आला. ईदनिमित्त नवे कपडे, सुरमा, अत्तर, टोपी, रुपाल घेऊन मुस्लिम बांधव अगदी सकाळपासूनच ईदगाहकडे निघालेले होते. युवक, ज्येष्ठ, बच्चे कंपनीचा उत्साह होता. पुरुष मंडळी ईदगाहकडे निघाली, घराघरातील महिला भगिणीही ‘ईद-उल-फित्र’च्या नमाजच्या तयारीला लागली. ईदगाहवर सामूहिक नमाज झाल्यानंतर शहरातील विविध मस्जिदमध्ये नमाज झाली. गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात पावसाची हजेरी आहे. शनिवारी आभाळ स्वच्छ होते. उन्हाची तीव्रता होती. घामाच्या धारा निघत होत्या. अशा परिस्थितीत हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर पोहोंचून ‘ईद-उल-फित्र’ची नमाज अदा करीत ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी केली. यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, पोलिस अधिक्षक अमोल तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, नगरसेवक सचिन बंडापल्ले, विकास कांबळे, अॅड. प्रदिप गंगणे, नायब तहसिलदार गणेश सरोदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थि राहून मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-फित्र’च्या शुभेच्छा दिल्या.

