रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यात दि. २३ फेबु्रवारी रोजी अवकाळी वारे, वादळ आणि गारपिटीमुळे शेतक-यांच्या रब्बी पिकांचे आणि बागांचे झालेले नुकसान तात्काळ मूल्यांकन करण्याबाबत रेणापुर तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेवरून रेणापुर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
रेणापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी वारे, वादळ आणि गारपिटीमुळे, एका नैसर्गिक आपत्तीने शेतक-यांच्या हातात असलेले पीक हिरावून घेतले आहे, ज्यामुळे शेतक-यांच्या ज्वारी, गहू, हरभरा, ऊस आणि इतर पिकांसह फळबागांचे मोठे आणि अपरिमित नुकसान झाले आहे, जे शेतकरी सहन करू शकत नाहीत. म्हणून, काल झालेल्या पावसामुळे, शेतक-यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकांचे आणि बागांचे मूल्यांकन तातडीने करावे.
त्यामळे शासनाने तात्काळ शेतक-यांना मदतीसाठी पुढे यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी या निवेदनावर रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कापसे, पद्मसिंह पाटील, हणमंत पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके, सुरेश लहाने, सचिन मोटेगावकर, सचिन पुंडलिकराव इगे, रहिम पठाण, अॅड. महेश राजे, रघुनाथ मदने, प्रशांत घोडके, विलास राठोड, संतोष शिंदे, गणेश कलाल, चंद्रकांत कातळे, गोविंद पवार, ज्ञानोबा कोल्हे, अतुल कातळे, प्रदीप माने, अजय चक्रे, धनंजय भांबरे, रोहित गिरी, काशिनाथ इस्ताळकर, भागवत इस्ताळकर, बाळासाहेब फुंदे, विश्वनाथ कागले, सतीष चव्हाण, अॅड. के. एन. सिरगिरे, पपेश दत्त, लिंबराज साखरे, दत्ता पवार, पाशा फरिद, दीपक जगदाळे, तानाजी सुर्यवंशी, राजभाऊ सांळुके, भगीरथ घाटुळे, शरद सुर्यवंशी, मुरलीधर पडुळे, बालासाहेब गरड, केशव माने, शहाजी पवार, शरद सुर्यवंशी, उध्दव दासुद, महेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

