नांदेड : प्रतिनिधी
पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियांवर ग्रामीण पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी ४० तराफे, ९ इंजिन व वाळू असा एकूण ४७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ४ मे रोजी पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. यावेळी पिंपळगाव निमजी येथील रहिवासी आरोपी शंकर व्यंकटराव डक, चांदू व्यंकटराव डक, पांडुरंग सदाशिव डक अवैधरित्या नदीपात्रातून वाळूचा उपसा करून साठवून ठेवत होते. तसेच पथकाने ४० तराफे (२० लाख रुपये), ९ इंजिन (२७ लाख रुपये) व ५ ब्रास वाळू (२५ हजार रुपये) असा एकूण ४७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

