16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeलातूरअवैध देशी दारू वाहतूक करणा-या आरोपीस अटक

अवैध देशी दारू वाहतूक करणा-या आरोपीस अटक

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध धंदे करणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे  शाखेकडून  शोधमोहीम राबवत येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात दि. १ डिसेंबर रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या कारवाईत एकूण ४ लाख २३ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या कारमध्ये देशी दारूच्या ३२ बॉक्स, दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण एकूण ४ लाख २३ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींकडून अवैधरीत्या देशी दारूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखे कडून नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संदीप वैजनाथ शिंगे यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी  दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे याचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार तुळशीराम बरुरे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR