लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या अवैध जुगार तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरोधात एकाच वेळी छापे टाकण्यात आले. १२ आरोपींविरोधात कारवाई करुन ५१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
शहरातील गांधी चौक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ने छापा टाकून आरोपी गणेश मन्मथ स्वामी (वय ३७ रा. भातांगळी ता. लातूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून २७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर विवेकानंद चौक हद्दीत छापा टाकून आरोपी अभिजीत श्रीकांत कांबळे (रा. आनंदनगर, लातूर), अमर वसंत सकट, जयाभाऊ वसंत (दोघे राहणार विलासनगर, नासिर कुरेशी (रा. खाटीक गल्ली), मनोज कांबळे (रा. सिद्धेश्वर चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींकडून २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर विविध गुन्ह्यातील आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंदे करणा-यांविरोधात यापुढेही कठोर, सातत्यपूर्ण व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लातूर पोलीस दलामार्फत देण्यात आला आहे.

