लातूर : प्रतिनिधी
विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणा-या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून ५४ हजार ४९० रूपयांची विदेशी दारू व वाहनासह ७ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई गांधी चौक पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर गुळ मार्केट ते गांधी चौक जाणारे रोडवर सापळा लावून विदेशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला विदेशी दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एक ग्रे रंगाची ब्रेझा कार क्रमांक एम. एच. २४ ए.एस. ५३६५ या वाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने बेकायेशीररित्या अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या वाहनाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यामध्ये वेगवेगळया कंपनीचे ५४ हजार ४९० रुपयाची विदेशी दारू व ६.५ लाख रुपये किमतीची नमूद कार मिळून आली. विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेल्या अमर जयराम बिराजदार (वय ३३ वर्ष रा. गव्हाण ता. निलंगा जि. लातूर, सध्या रा. याकतपूर रोड, सिंहगड सोसायटी लातूर) यांचेवर गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, संतोष गिरी, शिवा भाडुळे यांनी केली आहे.
















