परभणी : तालुक्यातील तरोडा गावातील युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. त्याचे हे यश गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे तरोडा गावातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अहदने आपल्या हे यश संपादन केले. त्याच्या यशामागे वडिलांचे कष्ट आणि त्याग मोठ्या प्रमाणात आहेत. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वडीलांनी मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना अहदला शिक्षणासाठी पाठबळ दिले. आर्थिक अडचणींवर मात करत अहमदने शिक्षण पूर्ण केले ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे. गावक-यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अहमद युसुफ शेख याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. भविष्यात एक यशस्वी डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे.

