19.9 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeलातूरअहमदपुरात अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

अहमदपुरात अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

अहमदपुर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची मागणी करणा-या आंदोलकानी अहमदपूरमध्ये सांय ९ वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांचा ताफा येथील सावरकर चौकात येताच अडविण्यात आला. यावेळी जोरदारपणे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंंदे हे परळी येथून कार्यक्रम आटोपून मुंबईकडे जात असताना अहमदपूर येथील सावरकर चौकांत आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री शिंंदे परळी येथे धनजंय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते अहमदपूर येथून मुंबईकडे निघाले असता अहमदपुरमध्ये मराठा आंदोलकांनी अतिशय धाडसाने त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी करीत अडविला.  दरम्यान गेल्या १ वर्षापासून राज्यात मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ओबीसीतून आरक्षण मिळावे  म्हणून गावोगावी आंदोलन सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR