30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeलातूरअहमदपूर तालुक्यातील उसाचे गाळप वेळेत करण्याची जबाबदारी आमची

अहमदपूर तालुक्यातील उसाचे गाळप वेळेत करण्याची जबाबदारी आमची

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील एकाही शेतक-याचा ऊस गाळपाशिवाय राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. सत्तेचा वापर केवळ पैशासाठी करणा-या भाजपा महायुतीला बाजूला सारून, प्रशासकीय पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित महाविकास आघाडीच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा) संयुक्त प्रचार सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्ताने राज्याचे माजी  मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.  ५ फेब्रुवारी रोजी सकाळी अहमदपूर तालुक्यातील आंधोरी जिल्हा परिषद गट व गण तसेच थोडगा पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ ग्रामपंचायत कार्यालया मागील मैदानावर ही जाहीर प्रचार सभा पार पडली.
आंधोरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. अश्विनी तुकाराम कदम, आंधोरी पंचायत समिती  गणातील उमेदवार बालाजी रामराव गुट्टे, खंडाळी जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. शितल प्रदीप खोमणे, खंडाळी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. उषाताई विठ्ठल आरदवाड, उजना पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. पार्वतीबाई देविदास सुरनर, किनगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. अरुणा शंकर गुट्टे, किनगाव पंचायत समिती गणातील उमेदवार श्रीमती जमुनाबाई मधुकर मुंडे, धानोरा पंचायत समिती गणातील उमेदवार आनंद वैजनाथ पगडले, हाडोळती जिल्हा परिषद गटातील वैजनाथ विजय निजवंते, हाडोळती पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. अंजनाबाई भीमाशंकर मुळके, कुमठा पंचायत समिती गणातील उमेदवार रुपेंद्र राघवेंद्र शेळके, शिरूर ताजबंद जिल्हा परिषद गटातील पांडुरंग भिवाजी कांबळे, शिरूर ताजबंद पंचायत समिती गणातील उमेदवार मंगेश चंद्रशेखर पाटील, वळसंगी पंचायत समिती गणातील उमेदवार गणपत बाबुराव माने, रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटातील विठ्ठल ज्ञानोबा घुमनवाड, रोकडा सावरगाव पंचायत समिती गणातील उमेदवार सुधीर शिवाजीराव गोरटे, काजळ हिप्परगा पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. मीनाक्षी राजेंद्र कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यासह उपस्थित राहून आमदार देशमुख यांनी संबोधित केले.
पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना, तात्कालीन राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यात असंख्य साठवण आणि पाझर तलाव बांधण्यात आले. त्यातून या भागात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी उसाचे उत्पादनही चांगले येत आहे. या उसाचे गाळप वेळेत व्हावे, अशी येथील शेतक-यांची प्रमुख मागणी आहे. आगामी काळात या शेतक-यांच्या सर्व उसाचे वेळेत गाळप करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.
लातूर जिल्हा परिषद आणि अहमदपूर पंचायत समितीमधील भ्रष्टाचार कमी करून शासनाच्या सर्व योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अंतर्भाव असलेल्या महाविकास आघाडीच्या, व या आघाडीकडून पुरस्कृत असलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. महायुतीमधील भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे धोरण आहे. त्यामुळे, निवडणूक काळात मतदारांना अमिष दाखवायचे आणि नंतर त्यांची कोणतीच कामे करायची नाहीत अशी पद्धत त्यांनी रूढ केली आहे. ती पद्धत बदलण्यासाठी जनतेची कामे घरपोच व्हावीत म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीने अत्यंत कार्यक्षम लोकाभिमुख उमेदवार दिले आहेत. त्यांना मोठ्या  मताधिक्क्याने विजय करावे, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जातात. ज्या आता होत असून या निवडणुकीत आपली लहान, मोठी कामे व्हावी, आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी आपल्याला उमेदवार निवडून द्यावे लागतात जे स्थानिकचे असावे लागतात हे आपल्याला माहीत आहे. आपल्याला आपले जनसेवक निवडायचे आहेत. जे अत्यंत चांगले, स्थानिक असायला हवेत पण विरोधकानी मूळचे उमेदवार या ठिकाणी न देता जिल्ह्याच्या बाहेरील, व्यावसायिक, ठेकेदार असे उमेदवार दिले जे आपली कामे करण्यासाठी वेळेत उपलब्ध होणार तर नाहीतच उलट आपल्या भागाचा विकास करतील की नाही याची देखील शंकाच आहे. पण काँग्रेस महा विकास आघाडीकडून आपल्या समोर स्थानिक व सर्व सामान्य कुटुंबातील,स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिलेले असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला मताचा पवित्र हक्क आपण बजावावा आणि आपण या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून आपल्या अंधोरी गट व गणाच्या सर्वांगीण विकासासाठी, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत पाठवावे, अशी विनंती त्यांनी यावेळी सर्व उपस्थित मतदारांना केली.
दरम्यान या जाहीर प्रचार सभेत भाग्यश्री क्षीरसागर, डॉ. गणेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लताबाई कदम, बालाजी गुट्टे, शंकर गुट्टे, मीनाक्षी कांबळे, शीतल ठोंबरे, अरुणा गुट्टे, जमुनाबाई मुंडे, विठ्ठल घुमानवाड, मीनाक्षी कांबळे, सोमेश्वर कदम, निलेश देशमुख, संजय पवार, वेंकट पाटील, सुधीर मुंडे, लक्ष्मण महाराज कदम, बालाजी शिंदे, कल्पना फरकांडे, रुपेंद्र शेळके यांच्यासह अंधोरी जिल्हा परिषद गट व गण यासह थोडगा पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनी, काँग्रेस आघाडी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला भगिनी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR