अहमदपूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने चांगलेच घेरले आहे. अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता बंद झाला आहे.
पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदपूर तालुक्यात दमदार पाऊस पडतो आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
















