अहमदपूर येथे अध्यादेशाची शिवसेनेकडून होळी

अहमदपूर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत ट्रिगरच्या नावाखाली अध्यादेश काढून थट्टा केली आहे. याचा जाहीर निषेध करण्यासाठी शासनाच्या  अध्यादेशाची होळी करण्यात आली.
महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी हा पाऊस योग्यवेळी न झाल्यामुळे चिंताग्रस्त व अडचणीत सापडला असताना शासनाने शेतक-यांच्या मदतीसाठी आल्याचे नाटक करत ट्रिगरच्या नावाखाली  अध्यादेश काढून शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे, जिपिएस फोटो काढण्याचे आदेश देत आहे. राज्यातील अनेक शेतक-यांनी आपल्या शेतीमधील पीक वाळून गेल्यामुळे काढून टाकले आहे, काढलेल्या पिकाचे पंचनामे करणे म्हणजे हा एक निगरगट्ट सरकारचा फार्स आहे. शेतक-यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे, विना अट सरसकट हेक्­टरी एक लाखाची मदत द्यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यावे, इंजिनियरींग, मेडिकलच्या विद्यार्थ्यांची ,महाविद्यालय व वसतिगृहाची फिस माफ करावी, जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पिक विमा, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत द्यावी, नुसत्या फसव्या घोषणा करून शेतक-यांची थट्टा करू नका, शेतक-यांच्या आत्महत्येस महायुतीचेच सरकार आहे असा घनाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी यावेळी केला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे,  विलास पवार हांगरगेकर,  मार्गदर्शक अनिकेत फुलारी,  गणेश माने,लहू बारवाड, संतोष आदटराव, पवन देऊळकर, पद्माकर पेंढारकर,  सुभाष गुंडीले, सुधाकर जायभाये, दत्ता कदम, भगवान कदम, सोमनाथ आढाव, शिवकुमार बेद्रे, बाळासाहेब पडीले, माऊली देवकत्ते, गजानन येन्ने, निलकंठ आलापुरे, व्यंकट सुरकुटे, रवी चामवाड, गोविंद पवार, गंगाधर कल्याणे, सचिन गुंडरे, मारोती बिराडे, एकनाथ तेलंग, विठ्ठल श्रीमंगले, धनंजय तुडमे, शिवदत्त मद्दे, ऋषिकेश खोमणे, प्रदीप शिंगडे, संतोष सूर्यवंशी, भारत केंद्रे, विनोद वाघमारे, प्रदीप कुकाले, गणेश चव्हाण, गिरीधर भंडे, कृष्णा रोकडे, रवी राचमल्ले, सुरेश अंकुलगे, मुन्ना शेख यांच्यासह शिवसैनिक व सलग्न संघटनेच्या विविध आजी-माजी पदाधिका-यांची उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news