लातूर : प्रतिनिधी
लातूर आरटीओ कार्यालयाच्या अधिका-यांकडून केल्या जाणा-या भ्रष्टाचार व चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली डोक्यावर एका टोपल्यात दोन कोंबड्या, दारूच्या बाटल्या व चिल्लर पैसे घेऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरटीओ कार्यालयाकडून वाहनधारकांची केली जाणारी अडवणूक व आर्थिक लुट थांबविण्यात यावी अशी मागणी वारंवार करूनही संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ डोक्यावर एका टोपल्यात दोन कोंबड्या, दारूच्या बाटल्या व चिल्लर पैसे घेऊन हा आगळा वेगळा मोर्चा काढण्यात आला. संतप्त मोर्चेक-यांनी तब्बल दोन तास आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या धरला. शेवटी पोलीस अधिका-यांनी हस्तक्षेप करून आरटीओ अधिका-यांना मोर्चासमोर आणले. त्यावेळी अध्यक्ष खंडापूरकर यांनी अधिका-यांना एक महिन्यात कामकाजात सुधारणा नाही केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला.
या मोर्चात पृथ्वीराजसिंह पाटील खंडापूरकर, अॅड. राणीताई स्वामी, अमोल नानजकर, काशीबाई हांडे, शिवा काळे, नेताजी जाधव, पृथ्वीराज पवार, नागेश जाधव, सुनील शिंदे, अजय राठोड, किरण मुंडे, रामभाऊ जवळगे, अमोल भालेराव, वैभव घोबाळे, रेखा खंदाडे, साक्षी भातलवंडे, विशाखा हातागळे, संकेत भोसले, शितल तमलवार, सुनील कदम, महेश पाटील उपस्थित
होते.
















