लातूर : प्रतिनिधी
नॅशनल कराटे अकॅडमी हॉल, नॅशनल स्पोर्ट्स सेंटर, साठोबाटो, काठमांडू, नेपाळ येथे दि. २४ व २५ मे रोजी झालेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ८ खेळाडुंनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारामध्ये ५ सुवर्णपदक, ३ रौप्य पदक व ८ कास्यपदकांची घवघवीत कमाई करत यश संपादन केले .
या स्पर्धेमध्ये काता व कुमिते अशा दुहेरी प्रकारांमध्ये युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीच्या खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. करण भाऊराव पवार- सुवर्ण, कास्य पदक, सम्राट राजभाऊ सूर्यवंशी-सुवर्ण, कास्य पदक, शिवम वाल्मीक सोमवंशी-सुवर्ण, कास्य पदक, आदित्य राम जगदाळे-सुवर्ण, कास्य पदक, गौरव प्रकाश कोर- रौप्य, कास्य पदक, अतुल बब्रुवान जाधव-सुवर्ण,कास्य पदक, यश विजय चौगुले-रौप्य पदक, कास्य पदक, अजिंक्य गौतम कांबळे-रौप्य, कास्य पदक. अंतिम खुल्या काता स्पर्धेमध्ये लातूरच्या करण पवार याने नेपाळ संघाच्या दीपक थारु याला १२ गुणाने नमवून प्रथम क्रमांकासहीत सुवर्ण पदक पटकाविले. या सर्व विजेत्या खेळाडूंना व मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेता खेळाडूंना मुख्य प्रशिक्षण व राष्ट्रीय पंच शिहाण तुषार अवस्थी यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.