नाशिक : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा धुरळा उडाला असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये अख्ख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळले आहे. नाशिकमधील देवळा तालुक्यातील फुले माळावाडी येथे चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. त्यानंतर आत्महत्याची नोंद करत तपास सुरू केला. पोलिसांकडून आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याचे कारण काय याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. माळवाडी येथील ४० वर्षांचा व्यक्ती, ३५ वर्षांची त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह फुले माळवाडीमध्ये घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ४० वर्षांच्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तर बायको अन् दोन मुलांचे मृतदेह बेडवर आढळले. यात देवळा पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षकांसह पोलिस कॉन्स्टेबल हे घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित आहे. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

