23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeसोलापूरआकर्षक विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदीर

आकर्षक विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदीर

पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी यात्रा सोहळ्याला सुरवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसर गजबजला आहे. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शनाबरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत.

रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शिवदत्तडेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे.

तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही महत्व आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची नगरी लखलखली असून, माय-बाप विठुरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR