निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील आकांक्षा सुरेश जाधव बारावी कला हिने ५० किलो वजन गटातील फ्री स्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे दि.२८ व २९ मार्च या कालावधीत निर्झरा केअर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत- २०२६’ आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या नामांकित महिला कुस्तीपटूंमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या व रोमहर्षक लढतीत आकांक्षा जाधव यांनी जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर आपली उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली. या यशाबद्दल शारदोपासक शिक्षण संस्थेचे बस्वराज वलांडे, राजेश वलांडे, रमेश बगदुरे, पंकज बियाणी, संचालक, प्र.प्राचार्य डॉ.शंकर कल्याणे, प्रा.विजयकुमार हंडे, प्रा.अंजना मुळे, पर्यवेक्षक प्रा.आशिष खडकेश्वर, डॉ.जाफर चौधरी, डॉ.सचिन हंचाटे, डॉ.प्रदीप पाटील, डॉ.विनोद चिंते, प्रा.बलभीम सातपुते, प्रा.विकास पाटील, संजीव होसुरे आदीसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

