आकाशात पहिल्यांदाच झाली फ्लाइंग कारची ‘फॉर्म्युला-१’

टेक्सास : वृत्तसंस्था
विज्ञान कथांमधूनच पाहायला मिळणारे दृश्य प्रत्यक्षात उतरले आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जेस्टन एअर गेम्समध्ये प्रथमच उडणा-या कारची शर्यत घेण्यात आली. ‘आकाशातील फॉर्म्युला वन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या रेसमध्ये जेस्टन वन नावाच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक एअरक्राफ्टचा वापर करण्यात आला.

रेसदरम्यान चार पायलटनी हवेतच बनवलेल्या ट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. ही शर्यत भविष्यातील अशा स्पर्धांचा आराखडा दाखवण्यासाठी आयोजित केल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे सहसंस्थापक तोमाज पाटन यांनी रेसमध्ये भाग घेतला.

सुमारे ११५ किलो वजनाची ही एक आसनी उडती कार १०२ किमी प्रतितास वेगाने ३२ किमी अंतर पार करू शकते. आठ शक्तिशाली रोटर्सच्या साहाय्याने ती उड्डाण करते. तिचा सांगाडा कार्बन फायबर व अ‍ॅल्युमिनियमचा बनलेला आहे. जवळपास २० मिनिटे अखंड उड्डाण करण्याची तिची क्षमता असून, ती १५०० फूट उंचीपर्यंत झेपावू शकते.

५५० ऑर्डरची नोंद
सुरक्षेच्या दृष्टीने या उडत्या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आपत्कालीन प्रसंगी आपोआप लँड होऊ शकते. धोक्याच्या क्षणी तत्काळ उघडणारा बॅलिस्टिक पॅराशूट यामध्ये बसवलेला आहे. सध्या या वाहनाची किंमत सुमारे ९५ लाख रुपये असून, अमेरिकेत हे उडविण्यासाठी पायलट परवान्याची आवश्यकता नाही. लॉन्चनंतर सर्व प्रारंभिक मॉडेल्स त्वरित विकले गेले असून, २०२८ साठी नव्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५५० ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news