आजच्या मोर्चाने जुन्या घटना आठवल्या; शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी
आजच्या मोर्चाने जुन्या घटना आठवल्या. महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी असे मोर्चे निघाले. काळा घोडा आणि परिसरात असणारे हे मोर्चे एकप्रकारचा इतिहास घडवणारे मोर्चे होते. त्या मोर्चानंतर आज इतक्या मोठ्या संख्येने जी एकजूट लोकांनी या मोर्चात दाखवली ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देणारी आहे असे शरद पवारांनी म्हटले. विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात ते सहभागी झाले होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण एक महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे.

आम्ही स्वत:साठी काहीही मागत नाही. लोकशाहीत संविधानाने जो अधिकार सगळ्यांना दिला आहे त्याचे जतन करण्याची वेळ आली आहे. निवडणुका झाल्या, त्यात विशेषत: विधानसभा निवडणुकीत जे काही प्रकार घडले त्यामुळे सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सोलापूरचे आमदार उत्तम जानकर यांनी त्यांचे अनुभव तुम्हाला सांगितले.

सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जात आहे. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावे लागेल. या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीचा अधिकार जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे असा निर्धार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

तसेच काही ठिकाणी लोक तक्रारीसाठी पुढे आले. बनावट आधार कार्ड बनवले जाते अशी माहिती दिली, त्यावर जिल्हाधिका-यांनी सिद्ध करून दाखवा असे आव्हान दिले. जेव्हा बनावट आधार कार्ड दाखवून दिले. त्यानंतर ज्याने हा आरोप सिद्ध करून दाखवला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा कुठला न्याय..जर एखादा आरोप कुणी सिद्ध करून दाखवला तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे. काहीही करा परंतु आम्ही या मतदानातील चोरी थांबवणार असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

दरम्यान, इथे असणा-या अनेक पक्षांची विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेदही असतात. पण आज देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल, मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर आपल्याला एक व्हावे लागेल असे आवाहन शरद पवार यांनी लोकांना केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news