आजपासून अर्ध्या तिकिटाच्या सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आज म्हणजेच १ सप्टेंबर पासून पासून एसटीने प्रवास करण्यासाठी ‘एनसीएमसी’कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला अर्ध तिकीट मिळणार नाही.

एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्डसाठी आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची ‘एनसीएमसी’ कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. सध्या या प्रक्रियेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून, सरकारी सवलतीसाठी पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही पुढील टप्प्यात ‘एनसीएमसी’ प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.

नव्या नियमानुसार, महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून प्रवास करताना अर्ध तिकीट भरण्यासाठी ‘एनसीएमसी’कार्डचा वापर करावा लागणार आहे. जर हे कार्ड प्रवाशांकडे नसल्यास तिकीटाची संपूर्ण रक्कम आकारली जाऊ शकते. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध किंवा कार्ड टॉप-अप केलेले आहे, याची खात्री करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी सर्व एसटी आगारांना Standard Operating Procedure (SOP)देखील पाठवण्यात आली आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. या प्रवर्गासाठी ‘एनसीएमसी’कार्डची सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांना विशेषत: बायोमेट्रिकच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा बोटांचे ठसे व्यवस्थित नोंदवले जात नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून सवलतीच्या तिकीट व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि पात्र प्रवाशांची पडताळणी अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रवाशांनी अद्याप ‘एनसीएमसी’ कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या एसटी आगाराशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news