लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणा-या ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ झ्र ग्रामीण टी-१०’ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज दि. २० मे रोजी सायंकाळी ५ वाजता येथील दयानंद महाविद्यालयच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, शहर काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, स्थाई समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, ट्वेंन्टी-वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषराव हाके पाटील, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुनिल पडीले, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई भिसे, पंचायत समिती गटनेता गुरूनाथ गवळी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश देशमुख, काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य व विविध संस्था पदाधिकारी, मान्यवर व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मागील ३ वर्षांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा स्पर्धा नव्या स्वरूपात होत असून प्रथमच मुलींचे संघही सहभागी होणार आहेत. दि. २० ते २५ मेदरम्यान होणा-या या स्पर्धेत जिल्ह्यातील निवडक गुणवंत खेळाडू सहभागी होणार असून दररोज दुपारी ३ पासून सामने खेळविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी, हा या स्पर्धेमागील धिरज देशमुख यांचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना आकर्षक पारितोषिकांसह वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार असून निवडक खेळाडूंचा विशेष संघ तयार करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
आज होणारे सामने
दुपारी ३ ते ४.३०- औसा वॉरियर्स विरुद्ध जळकोट टायटस
सायं. ४.३० ते ६-शिरुर अनंतपाळ स्ट्रायकर विरुद्ध लातूर सीटी किंग्ज इलेव्हन.
सायं. ६ ते ७.३० उदगीर युनायटेड विरुद्ध ग्रामीण इंडियन्स.
सायं. ७.३० ते ९- चाकुर चॅलेंजर विरुद्ध निलंगा नाईटस्
रात्री ९ ते १०.३०-लातूर लॉयन्स विरुद्ध देवणी डेअर डेव्हील्स.
रात्री १०.३० ते १२-रेणापूर रॉयल्स विरुद्ध अहमदपूर अॅसेसिन्स.
















