लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ लातूर व गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्ट लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील व्यंकटेशनगरमधील वनमाळी बालाजी मंदिरात आज दि. १७ मे रोजी सामुहिक पवित्र नाथदिक्षा (कानचिरा) सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात आज सकाळी ९ वाजता विधिवत पुजा मांडणी, डमरु वादन, सकाळी १० वाजता पवित्र नाथदिक्षा (कानचिरा)सोहळा, दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय नाथ समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयाजी नाथ, महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, महासंघाचे राज्य सदस्य रवींद्र जाधव, महासंघाचे राज्य सचिव माधव क्षीरसागर, लातूर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मधुरकर, ह. भ. प. भरत महाराज, राजेंद्र देवगण, विश्वनाथ नाथ, डॉ. गजानन चव्हाण, सोमनाथ धायडे, दत्तात्रय सूर्यवंशी, सदानंद योगी, दिगंबर रिद्धीवाडे, भरत चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जगन्नाथ कदम, गोरख जोगी, धर्मनाथ रिद्धीवाडे, परमेश्वर गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विवेकानंद योगी, संतोष रोकडे, नागनाथ जाधव आदींनी केले.
















